अखेर लाभार्थ्यांना शेळी गट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST2021-02-24T04:33:52+5:302021-02-24T04:33:52+5:30
तेर : दोन महिन्यांपूर्वी लोकवाटा भरूनदेखील लाभार्थ्यांना शेळ्यांचा गट वाटप होत नसल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले ...

अखेर लाभार्थ्यांना शेळी गट वाटप
तेर : दोन महिन्यांपूर्वी लोकवाटा भरूनदेखील लाभार्थ्यांना शेळ्यांचा गट वाटप होत नसल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने तत्काळ याबाबत कार्यवाही करून संबंधित लाभार्थ्यांना शेळीगट वाटप केले.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील घटकांना ७५ टक्के अनुदानावर शेळ्यांचा गट वाटप करण्यात येतो. परंतु, लोकवाटा भरून दोन महिने झाले तरी संबंधित विभागाकडून शेळ्यांचा गट वाटप केला जात नव्हता. याबाबत ‘लोकमत’ ने १३ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यानंतर पशुसंवर्धन विभागाने कार्यवाही केली. दरम्यान, तेर येथे लाभार्थी पांडुरंग बगाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन शेळ्यांची वैद्यकीय तपासणी न करता त्यांचे वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.