साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत बिघडली; ग्रंथदिंडीला राहणार गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 23:01 IST2020-01-09T22:59:16+5:302020-01-09T23:01:07+5:30

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना काही दिवसांपासून कंबरदुखीचा त्रास होत आहे.

father francis dibrito president of the Literature Summit, lost his health | साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत बिघडली; ग्रंथदिंडीला राहणार गैरहजर

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची तब्येत बिघडली; ग्रंथदिंडीला राहणार गैरहजर

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना काही दिवसांपासून कंबरदुखीचा त्रास होत आहे. मुंबई ते उस्मानाबाद रेल्वे प्रवासामुळे त्रास थोडा वाढला असल्याने येथील डॉकटरांनी त्यांची तपासणी करून विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

सकाळी ग्रंथदिंडीच्या प्रसंगी उपस्थित राहिल्यावर दगदग होऊन तब्येत आणखी खराब होऊ नये, यादृष्टीने सकाळी विश्रांती घेऊन दुपारी उदघटनाच्या वेळी ते उपस्थित राहतील, असा विचार सुरू असल्याचे दिब्रिटो यांचे भाचे जेम्स लोबो यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

Web Title: father francis dibrito president of the Literature Summit, lost his health