जेवळी येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:59+5:302021-07-24T04:19:59+5:30

विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील हभप प्रल्हाद सरडे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री हरी जागर ...

In the excitement of Gurupournima program at Jawali | जेवळी येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात

जेवळी येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात

विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील हभप प्रल्हाद सरडे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री हरी जागर भजनाचा कार्यक्रम झाला. पहाटे काकडा आरती व महाअभिषेक आणि भजन करण्यात आले. अकरा वाजता संपूर्ण गावातील प्रमुख मार्गावरून प्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. बसवेश्वर चौकात हजरजबाबी भारुडाचा कार्यक्रम झाला. महिलांचा सहभाग लक्षवेधक होता. सायंकाळी चार वाजता श्री बसवेश्वर हायस्कूलच्या मैदानावर हभप रामदादा राजपूत, हभप हरी गाडेकर, हभप चंद्रकांत ढोबळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. श्यामसुंदर पाटील व रघुनाथ पोतदार यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना काल्याचे प्रसाद वाटप करण्यात आले. प्रदक्षिणा परतीच्या वेळी रस्त्यावर नेत्रदीपक पावलाचा व फुगडी खेळण्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सहा वाजता विठ्ठल मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रुद्रवाडी, पांढरी,माळेगाव येथील वारकरी आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर माळी, शिवाजी कटारे, संजय पोतदार, अशोक शिंगाडे,काशिनाथ माळी, विठ्ठल रायभोगे, गुणवंत ढोबळे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: In the excitement of Gurupournima program at Jawali