पक्षामध्ये प्रत्येकाने निष्ठेने काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:55+5:302021-07-24T04:19:55+5:30

भूम -पक्षात काम करणाऱ्यांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. तेव्हा प्रत्येकाने आपआपल्या बुथ परिसरातील मतदारांकडे लक्ष केंद्रित करावे. त्याच्या ...

Everyone in the party should work faithfully | पक्षामध्ये प्रत्येकाने निष्ठेने काम करावे

पक्षामध्ये प्रत्येकाने निष्ठेने काम करावे

भूम -पक्षात काम करणाऱ्यांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. तेव्हा प्रत्येकाने आपआपल्या बुथ परिसरातील मतदारांकडे लक्ष केंद्रित करावे. त्याच्या समस्या विचारात घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

भारतीय जनता पक्षाची शक्ती केंद्रप्रमुख, बुथ केंद्र व पक्षीय संघटन आढावा बैठक भूममध्ये शुक्रवारी पार पडली. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर व पक्षाच्या सूचनेवरून घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील, ज्येष्ठ नेते खंडेराव चौरे, शिवाजीराव पाटील, कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

आ. पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून गाेरगरीब जनतेसाठी वेगवेगळ्या याेजना राबविल्या जात आहेत. या याेजना अधिकाधिक व्यक्तींमार्फत पाेहोचाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी भूम तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्रप्रमुख, केंद्रप्रमुख आणि पक्षीय संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनेकांनी आपल्या समस्या व्यक्त केल्या. बैठकीस जालिंदर मोहिते, आदम शेख, महादेव वडेकर, भाऊसाहेब कुटे, संतोष सुपेकर, शंकर खामकर, सरपंच बालाजी बांगर, उमेश नाईकिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, मधुकर अर्जुन, श्रीराम मुळे, राजसिंह पांडे, सुरेद्र बोंदार्ड, रोहिदास भोसले, मुस्तफा पठाण, महेबूब शेख, संदीप खराडे, बापू बगाडे, सचिन बारगजे, लक्ष्मण भोरे, सुजित वेदपाठक, महिला तालुकाध्यक्षा लता गोरे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Everyone in the party should work faithfully