शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी आठ हजारावर विद्यार्थी ‘स्कूल चले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

१३७ शाळांचे उघडले कुलूप - येत्या काही दिवसांत २४६ शाळा हाेऊ शकतात सुरू उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग काहीअंशी ओसरल्यानंतर ...

१३७ शाळांचे उघडले कुलूप - येत्या काही दिवसांत २४६ शाळा हाेऊ शकतात सुरू

उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग काहीअंशी ओसरल्यानंतर शासनाने आठवी व त्यापुढील वर्ग सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार मागील महिनाभरात एकही काेराेना रुग्ण आढळून न आलेल्या जिल्ह्यातील २४६ पैकी १३७ गावांतील शाळांची घंटा गुरुवारी सकाळी घणाणली. पहिल्याच दिवशी सुमारे ८ हजार ११५ विद्यार्थी ‘स्कूल चले’.

काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले हाेते. काही दिवस हे वर्ग चालल्यानंतर काेराेनाची दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट तीव्र स्वरूपाची असल्याने पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. लसीकरणासह विविध उपाययाेजनांनंतर संसर्ग काहीअंशी ओसरला. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने आढावा घेण्याचे निर्देश शासनाने स्थानिक शिक्षण विभागाला दिले हाेते. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ६४० शाळांचा आढावा घेतला. त्यानुसार २१३ गावांमध्ये मागील महिनाभरात काेराेना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या शाळा सुरू करता येत नाहीत. पालिका हद्दीतील १४७ व ३४ निवासी शाळा सुरू करण्यासही परवानगी नाही. या ३९४ गावांतील शाळा वगळता उर्वरित २४६ शाळा सुरू करता येऊ शकतात, असे कळविले असता, शासनाने उपराेक्त हिरवा कंदील दाखविला हाेता. त्यानुसार उपराेक्त गावांतील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले हाेते. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याची सूचनाही केली हाेती.

त्यानुसार बहुतांश मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे तंताेतंत पालन करीत शाळा सुरू केल्या. शिक्षण विभागाने दुपारी ३ वाजेपर्यंत घेतलेल्या आकडेवारीनुसार १३७ शाळा उघडल्याचे समाेर आले. पहिल्याच दिवशी ८ हजार ११५ विद्यार्थ्यांनी वर्गात बसून ज्ञानार्जन केले. येत्या दाेन-तीन दिवसांत विद्यार्थीसंख्याही पूर्ववत असा विश्वास बहुतांश शाळांकडून बाेलून दाखविण्यात आला.

चाैकट...

गुलाबपुष्प देऊन स्वागत...

शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू झाले असले तरी काेराेनामुळे शाळा उघडल्या नव्हत्या. काेराेनाचा संसर्ग काहीअंशी कमी झाल्याने गुरुवारी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. बहुतांश शाळांकडून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे तंताेतंत पालन केले जात आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन शाळांनी केले आहे.

काेट...

मागील महिनाभरात एकही काेराेनाचा रुग्ण आढळून आला नसलेल्या २४६ गावांतील शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत शाळांना आदेशित केले आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी १३७ शाळा उघडल्या गेल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ८ हजारावर विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन ज्ञानार्जन केले. साेमवारपर्यंत ही संख्या आणखी वाढेल.

- गजानन सूसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

जिल्ह्यात काेणत्या, किती शाळा...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक - १३५

जिल्हा परिषद माध्यमिक - ५३

खासगी उच्च प्राथमिक - २३

खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक - ४२९

एकूण - ६४०