नाल्या तुंबल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:05+5:302021-04-11T04:32:05+5:30

उस्मानाबाद - शहरातील बँक काॅलनी भागातील नाल्या तुंबल्या हाेत्या. त्यामुळे काही भागात सांडपाणी रस्त्यावर येत हाेते. परिणामी रहिवाशांना दुर्गंधीचा ...

The drains are full ... | नाल्या तुंबल्या...

नाल्या तुंबल्या...

उस्मानाबाद - शहरातील बँक काॅलनी भागातील नाल्या तुंबल्या हाेत्या. त्यामुळे काही भागात सांडपाणी रस्त्यावर येत हाेते. परिणामी रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत हाेता. याबाबत लाेकांनी तक्रारी केल्यानंतर शनिवारी नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून नाल्यांची साफसफाई करण्यात आली.

पालिकेचे दिवसा ‘दिवे’

उस्मानाबाद -एकीकडे हद्दवाढ भागातील बंद पडलेले पथदिवे सुरू करण्याकडे पालिकेकडून डाेळेझाक केली जात आहे. असे असताना दुसरीकडे शनिवारी समतानगर भागातील पथदिवे भरदुपारी सुरू हाेते. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत हाेती.

मलमपट्टीही दर्जाहीन...

ईट -औरंगाबाद-साेलापूर राष्ट्रीय महामार्गापासून साेन्नेवाडी मार्गे ईटकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले हाेते. याबाबत ग्रामस्थांतून ओरड झाल्यानंतर खड्डे बुजविण्यात आले. परंतु, काही खड्डे जैसे थे आहेत. जे खड्डे बुजविले, तेही अवघ्या काही दिवसांतच उखडले आहेत.

कडब्याचे दर वाढले

उस्मानाबाद - गतवर्षी झालेल्या जाेरदार पावसामुळे रबी हंगामातील ज्वारीची पिके जाेमदार आली. ज्वारीचे दर पडले असले तरी कडब्याचे दर मात्र वाढले आहेत. अनेक पशुपालक सध्या खडबा खरेदी करताना दिसून येत आहेत.

खवाभट्ट्या बंद...

भूम - लाॅकडाऊन उठल्यानंतर खवाभट्ट्या सुरू झाल्या हाेत्या. परंतु, पुन्हा काेराेनाचा संसर्ग वाढल्याने बाजारपेठेत खव्याला उठाव नाही. त्यामुळे खवाभट्ट्या बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. परिणामी दूधाचे दरही घसरले आहेत.

Web Title: The drains are full ...