डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:44+5:302021-06-01T04:24:44+5:30

लोहारा : लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे युगप्रवर्तक चैत्यविहार, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी-रक्षाचे स्मारक क्रांती परिसर येथे उभारण्यात येत ...

Dr. Bhumipujan of Ambedkar's memorial | डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन

लोहारा : लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे युगप्रवर्तक चैत्यविहार, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी-रक्षाचे स्मारक क्रांती परिसर येथे उभारण्यात येत आहे. याची सुरुवात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त निवडक अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शासन आदेशानुसार समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या बैठकीत आ. ज्ञानराज चौगुले यांच्या शिफारशीनंतर सालेगाव या गावाची निवड करण्यात आली होती, तसेच आ. ज्ञानराज चौगुले यांनी सामाजिक न्यायमंत्री व विशेष साहाय्य विभाग यांना पत्र पाठवून सालेगाव येथे युगप्रवर्तक चैत्यविहार, बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी-रक्षाचे स्मारक क्रांती परिसर येथे उभे करण्यासाठी मंजुरी व निधीची मागणी केली होती. यानुसार या कामासाठी ५ कोटी ९४ लाख १८ हजार ३७७३ इतका निधी मंजूर झाला होता. याचे भूमिपूजन सोमवारी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते झाले.

यावेळी किरण गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता किशोर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, बाबूराव शहापुरे, विलास भगत, संजय रणखांब, व्यंकट बडूरे, प्रवीण गोरे, स्वप्निल चव्हाण, मुरली पाटील, विजयकुमार भालेराव, अविनाश भालेराव, आविष्कार भालेराव, रोहित भालेराव, अण्णासत्व भालेराव आदी उपस्थित होते.

फोटो - लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किरण गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता किशोर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, बाबूराव शहापुरे, विजयकुमार भालेराव आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Bhumipujan of Ambedkar's memorial