२१ केंद्रावर कोविशिल्डचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:10+5:302021-09-17T04:39:10+5:30

साडेतीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. मात्र, काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही, शिवाय ...

Dose of Covishield at 21 centers | २१ केंद्रावर कोविशिल्डचा डोस

२१ केंद्रावर कोविशिल्डचा डोस

साडेतीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. मात्र, काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही, शिवाय येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचे भाकीत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी मुरूम, सास्तूर, लोहारा, भूम, वाशी, तेर ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, परंडा, कळंब, उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, कळंब येथील फुले-आंबेडकर वाचनालय, तुळजापूर येथील मकावती गल्लीतील फंक्शन हॉल, परंडा येथील सिद्वीवाल कॉम्प्लेक्स, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, लोहारा येथील प्रभाग १७ बाल गणेश मंडळ, वाशी येथील शिवशक्ती नगरमधील जि.प. पा. शाळा, भूम येथील रवींद्र हायस्कूल या केंद्रावर कोविशिल्डची लस मिळेल. १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने लस घेता येईल.

Web Title: Dose of Covishield at 21 centers