आज ५८ केंद्रांवर मिळणार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST2021-07-14T04:37:40+5:302021-07-14T04:37:40+5:30
उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस ...

आज ५८ केंद्रांवर मिळणार डोस
उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी ५८ केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४६ केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार आहे, तर १२ केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. जिल्ह्यात जून महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. शिवाय, येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा, म्हणून नागरिकही स्वत:हून पुढे येऊन लस घेत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून ग्रामीण तसेच शहरी भागात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आला आहे. या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस घेता येणार आहे. तर ४६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध असणार आहे. या केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे.
या ठिकाणी मिळेल कोव्हॅक्सिन
मरुम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालये, तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळेल.
येथे मिळणार कोविशिल्ड
जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रत्येकी एका उपकेंद्रात लसीकरण मोहीम पार पडणार आहे. उस्मानाबाद शहरातील वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. या केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस घेता येईल.