धाराशिवला झेडपी निवडणुकीतही पालिका पॅटर्न? महायुतीतून शिंदेसेना विभक्त होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:42 IST2026-01-21T12:39:51+5:302026-01-21T12:42:12+5:30

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शिंदेसेना पालिकेप्रमाणे स्वबळ आजमावण्याच्या तयारीत असली, तरी भाजपनेही हे गृहित धरून तयारी केलेली दिसते.

Dharashiv ZP election 2026: Municipal pattern in Dharashiv ZP elections too? Shinde Sena on the verge of separation from Mahayuti | धाराशिवला झेडपी निवडणुकीतही पालिका पॅटर्न? महायुतीतून शिंदेसेना विभक्त होण्याच्या मार्गावर

धाराशिवला झेडपी निवडणुकीतही पालिका पॅटर्न? महायुतीतून शिंदेसेना विभक्त होण्याच्या मार्गावर

- चेतन धनुरे
धाराशिव :
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणसंग्रामात अखेरच्या क्षणी नवे ट्वीस्ट समोर येऊ लागले आहेत. महायुती म्हणून एकत्र लढणार, असा सूर लागलेला असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध लक्षात घेता शिंदेसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. त्यामुळे भाजपनेही पुढची पावले ओळखत सर्वच गट व गणांमध्ये स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी केली आहे.

मंगळवारी अनेक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज भरून झाले आहेत. मात्र, एबी फॉर्म आज अखेरच्या दिवशी दिले जाणार आहेत. गत महिन्यात झालेल्या आठ नगर परिषदांच्या निवडणुकीत चार ठिकाणी भाजप तर, चार ठिकाणी शिंदेसेनेला यश मिळाले होते. मात्र, शिंदेसेनेने जिंकलेल्या चारपैकी तीन पालिकांत भाजपविरोधात लढा दिला होता. आता झेडपीतही हाच पॅटर्न तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात शिंदेसेनेकडून आ. तानाजी सरावंत यांनी यापूर्वीच भाजपविरोधात लढण्याचे संकेत देऊ केले आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजपनेही सर्व गट, गणात तयारी केली आहे. भूममध्ये तर मंगळवारी पाच गट व दहाही गणांत उमेदवाऱ्या दाखल केल्या आहेत.

तुळजापूर विधानसभेत शिंदेसेनेची तुल्यबळ ताकद नसल्याने भाजप येथून शिंदेसेनेस सोबत घेण्याची किंवा घेतली, तरी झुकते माप देण्याची शक्यता जवळपास नाहीच. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात कळंब तालुक्यातील शिंदेसेना वगळता इतर ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी सोबत लढण्यास प्रखर विरोध केला आहे. जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी कसलेही आदेश मानले जाणार नाहीत, भाजपविरोधात लढण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले. अर्थात यामागे जिल्हा मुख्यालयाच्या धाराशिव पालिकेत शिंदेसेना शून्यात गेल्याचे शल्यही आहे.

दरम्यान, उमरगा विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. काँग्रेसचे तत्कालीन नेते बसवराज पाटील आता भाजपत असल्याने येथेही शिंदेसेनेला झुकते माप मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शिंदेसेना पालिकेप्रमाणे स्वबळ आजमावण्याच्या तयारीत असली, तरी भाजपनेही हे गृहित धरून तयारी केलेली दिसते.

Web Title : धाराशिव ज़ेडपी चुनाव में शिवसेना बीजेपी से अलग हो सकती है।

Web Summary : धाराशिव ज़ेडपी चुनाव में शिवसेना बीजेपी के विरोध के कारण स्वतंत्र रूप से चुनाव लड़ सकती है। बीजेपी सभी सीटों पर तैयारी कर रही है, जो पिछले नगरपालिका चुनावों के टकराव को दर्शाता है। निर्वाचन क्षेत्रों में गठबंधन अनिश्चित हैं।

Web Title : Shiv Sena may separate from BJP in Dharashiv ZP election.

Web Summary : In Dharashiv ZP elections, Shiv Sena might contest independently due to local opposition to BJP. BJP prepares for all seats, mirroring past municipal poll clashes. Alliances uncertain across constituencies.