धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:37 IST2025-05-06T15:36:15+5:302025-05-06T15:37:10+5:30
Latest Crime news in Marathi: तुळजापूर तालुक्यात एका व्यावसायिकाचा मृतदेह एका पुलाखाली आढळून आल्याने खळबळ उडाली. दुकानातून कार घेऊन बाहेर पडलेल्या व्यावसायिकाचा मृत्यू कसा झाला, याबद्दल काहीही समोर आले नाही.

धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
Marathi Crime News: रात्री दुकानातील कामगारांना म्हणाले, 'मी बाहेर जाऊन येतो' आणि परत आलेच नाही. नंतर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना एक कार रस्त्याजवळ उभी असलेली दिसून आली. पोलीस कार घेऊन पोलीस स्टेशनला आले. पण, कारचे घेऊन गेलेल्या व्यावसायिकाबद्दल काही कळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी शोध सुरू केला. ३ मे रोजी दुकानातून बाहेर पडलेल्या व्यावसायिकाचा ४ मे रोजी पुलाखाली मृतदेह आढळून आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तुळजापूर तालुक्यातील ईटकळ ही घटना घडली. एका ४५ वर्षीय व्यावसायिकाचा मृतदेह ४ मे रोजी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील निलेगाव तलावावरील पुलाखाली आढळून आला. दुपारच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला.
कामगारांना म्हणाले बाहेर जाऊन येतो
ईटकळ येथील प्रथम बारचे मालक श्रीशैल मल्लिकार्जुन नंदर्गी ३ मेच्या रात्री कामगारांना 'बाहेर जाऊन येतो,' असे म्हणून स्वतःच्या कारमधून बाहेर पडले. मात्र, परत आलेच नाहीत.
पुलाजवळ उभी होती कार
दरम्यान, रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना सोलापूर-हैदराबाद मार्गावरील बाभळगाव-केरूर पुलाजवळ चारचाकी गाडी आढळून आली. संशय बळावल्याने पोलिसांनी संबंधित कार ईटकळ औटपोस्ट येथे आणली. मात्र, कारचे मालक नंदर्गी यांचा काही तपास लागला नव्हता.
यानंतर, रविवारी (४ मे) सकाळी पोलिसांनी शोध सुरू केला असता, बाभळगाव येथील तलावावर असलेल्या पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर, पोलिसांनी पंचनामा करून नळदुर्ग ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
घरी मृतदेहच घेऊनच जावं लागलं
नंदर्गी यांच्या घरी सोमवारी (५ मे) कार्यक्रम होता. यासाठी पै-पाहुण्यांची शनिवारपासूनच वर्दळ सुरू झाली होती. असे असतानाच रविवारी सकाळी त्यांचा पुलाखाली मृतदेह आढळून आला.
त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना मृतदेह घेऊन गावाकडे परतावे लागले. नंदर्गी यांचे मूळ गाव झळकी (ता. आळंद) हे आहे. व्यवसायानिमित्त ते ३० वर्षापूर्वी ईटकळ येळे आले होते.