शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 06:36 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे.

उस्मानाबाद - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे़ तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली. जिल्'ाच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मंगळवारी उस्मानाबादेत आले होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले़ ते म्हणाले, आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही आॅक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला़ आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल.पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आहेत़ यासाठी निधी कमी पडू देणार नाही़ कोणत्याही भागातअन्न-धान्याची टंचाई भासल्यासतेथे पुरवठ्यासाठी सरकारची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले़कृष्णा-मराठवाडा योजनेसाठीलवकरच २२०० कोटीकृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी आखलेल्या योजनेला आमच्या सरकारने गती दिली आहे़ आतापर्यंत ८०० कोटी रुपये निधी या योजनेस दिला़ तो पूर्णत्वाकडे नेण्यासाठी २२०० कोटी रुपयांचे कर्ज नाबार्डकडून घेण्यात येत आहे़ ते मिळताच योजनेसाठी एकरकमी निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली़मुनगंटीवारांनी कुठे बंदूक चालविली?अवनी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखणच केली़ ते म्हणाले, परिस्थितीनुसार काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात़ मुनगंटीवार यांचा राजीनामा घ्यायला त्यांनी स्वत: तर बंदूक हातात घेऊन अवनीला ठार केले नाही ना? मात्र, ठार करण्याची जी प्रक्रिया आहे, त्यात काही चूक झाली असल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र