शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक विकास निधीतील रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST

(फोटो : ओम राजे ०६) उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या स्थानिक खासदार निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण ...

(फोटो : ओम राजे ०६)

उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या स्थानिक खासदार निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण येथील पवनराजे कॉम्प्लेक्स येथे खा.ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भारत देशमुख, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, जि.प. सदस्य बालाजी जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः उपचार आणि दवाखान्यापर्यंत पोहोचणेही अनेकांना अशक्‍य होते. रुग्णांची वेळेवर ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार होण्यासाठी विविध सुविधांची गरज आहे. त्यात प्रामुख्याने रुग्णवाहिकांची उपलब्धता महत्त्वाची आहे. रुग्णांची ही गैरसोय दूर व्हावी, या अनुषंगाने नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या स्थानिक खासदार निधीमधून दोन रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर, नगसेवक सोमनाथ गुरव, शहरप्रमुख पप्पू मुंढे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, भीमा जाधव, बालाजी सुरवसे, दिलीप जावळे, विधानसभा संघटक तथा डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, पंकज पाटील, ओंकार आगळे आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.