शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पुन्हा केली शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : मागील महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली होती. प्रतिदिन शंभरीच्या खालीच रुग्ण आढळून येत होते. बुधवारी दिवसभरात १०२ ...

उस्मानाबाद : मागील महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली होती. प्रतिदिन शंभरीच्या खालीच रुग्ण आढळून येत होते. बुधवारी दिवसभरात १०२ रुग्ण आढळून आले. कोरोना संसर्गाचा पूर्णत: धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट धडकली. तेव्हापासून प्रतिदिन रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन झपाट्याने वाढ होती. एप्रिल, मे महिन्यांत ६०० ते ७०० रुग्णांची नोंद होत होती. जून महिन्यापासून रुग्णांची संख्या घटू लागली. जुलै महिन्यात सरासरी ५० ते ८० रुग्ण आढळून येत होते. धोका टळलेला नसल्याने आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व कोरोनासदृश व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. बुधवारी ६५४ आरटीपीसीआर अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले. यात ४२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर, दिवसभरात १ हजार ३३० जणांची चाचणी करण्यात आली असता, यामध्ये ६० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अशा एकूण १०२ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे आता ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८२३ वर जाऊन ठेपला आहे. कोरोना संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नसल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. बुधवारी दिवसभरात १ रुग्णाचा मृत्यू झाला, तर ३० जण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला.

उस्मानाबाद तालुक्यात ४७ रुग्ण

बुधवारी जिल्ह्यात नव्या १०२ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ४७, परंडा तालुक्यात १८, भूम तालुक्यात १३, कळंब तालुक्यात १२, तुळजापूर व वाशी तालुक्यात प्रत्येकी ४ रुग्ण, उमरगा तालुक्यात ३ तर लोहारा तालुक्यात १ रुग्ण आढळून आला.