पालिका निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:45+5:302021-07-11T04:22:45+5:30

कळंब : आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. शहरात काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग मोठा असून, ...

Congress will come out in full force in the municipal elections | पालिका निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार

पालिका निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार

कळंब : आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. शहरात काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग मोठा असून, प्रत्येक वाॅर्डातील अशा मंडळींना कार्यकर्त्यांनी सक्रिय करावे, असे आवाहन कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी केले.

कळंब येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्ष भैया निरफळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंब शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसची संयुक्त बैठक झाली. यावेळी येणाऱ्या नगरपालिका निडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा झाली. तसेच नवीन पदाधिकऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. काँग्रेस हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे व शहरातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शहर काँग्रेसने पक्षबांधणीवर भर दिल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये कळंब शहर कार्याध्यक्षपदी सचिन गायकवाड, तालुका अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी शहाजान शिकलगार, मागासवर्गीय विभागाच्या शहराध्यक्षपदी सुरेश मस्के, शहर सचिवपदी विश्वास हौसलमल, ओबीसी विभागाच्या शहराध्यक्षपदी हरिदास जाधव, शहर उपाध्यक्षपदी भीमराव कुचेकर, युवक काँग्रेस शहराध्यक्षपदी ताहेर शेख, उपाध्यक्ष फैयाज मणियार, सचिव राहुल खैरमोडे, सरचिटणीसपदी श्रीधर हांगे यांचा समावेश आहे. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भागवत धस, आप्पासाहेब शेळके, शंकर करंजकर, दिलीपसिंह देशमुख, संजय घोगरे, मुजम्मिल पटेल, कलीम तांबोळी, बिलाल काझी, रोहित कसबे, अमर शेख, भूषण देशमुख, नासर शेख, अविनाश पानसरे, अमोल गुरसाळे, सुरेश मस्के, स्वप्निल हिरे, जलील शेख, जुबेर शेख, मणियार अरीश, हरून बागवान, यासर शेख, सलमान बागवान, सूरज जोगदंड, विशाल राक्षे, ओम शिंदे, बी. बी. ताटे, मोईन तांबोळी, सिद्धेश्वर खैरमोडे, संतोष लोंढे आदी उपस्थित होते.

Web Title: Congress will come out in full force in the municipal elections