समर्थ काकनाळे याचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:55+5:302021-07-11T04:22:55+5:30
उमरगा : जागतिक विक्रमाबरोबरच वेगवेगळ्या पाच विक्रमांमध्ये सहभाग नोंदविलेल्या येथील बालवैज्ञानिक समर्थ जरचंद काकनाळे याचा शिक्षणाधिकारी गजानन सुसर ...

समर्थ काकनाळे याचा सत्कार
उमरगा : जागतिक विक्रमाबरोबरच वेगवेगळ्या पाच विक्रमांमध्ये सहभाग नोंदविलेल्या येथील बालवैज्ञानिक समर्थ जरचंद काकनाळे याचा शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी रत्नमाला गायकवाड, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, प्रा. डी. व्ही. फुगटे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी, कक्षाधिकरी पी. वाय. जाधव, माजी अधीक्षक जयपाल गहेरवार यांची उपस्थिती होती. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मार्टिन ग्रुपतर्फे ७ फेब्रुवारीला तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथून भारतातील तब्बल एक हजार बाल वैज्ञानिकांनी बनविलेले संपूर्ण भारतीय बनावटीचे १०० लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. यात समर्थ काकनाळे याचा सहभाग होता. हे लघु उपग्रह सोडल्यानंतर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, आसिष्ट बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड असे पाच विक्रम झाले. पाचही विक्रमाचे प्रमाणपत्र नुकतेच या बालवैज्ञानिकांना मिळाले.