माेरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:19 IST2021-02-05T08:19:35+5:302021-02-05T08:19:35+5:30

उमरगा : भारत शिक्षण संस्था, उमरगाचे अध्यक्ष अमोल (भैय्या) शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात त्यांचा ...

Celebrate Maere's birthday with various activities | माेरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

माेरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

उमरगा : भारत शिक्षण संस्था, उमरगाचे अध्यक्ष अमोल (भैय्या) शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध उपक्रम घेण्यात आले. माेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या युट्यूब चॅनलचा प्रारंभ करण्यात आली. हरित परिसर या योजनेअंतर्गत व ‘माझे कार्यालय - सुंदर कार्यालय’ याअंतर्गत सर्वप्रथम पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या घराचे रेन वाॅटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. याचा प्रारंभही करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून अपंगांसाठी दोन व्हीलचेअर व एक वॉकर भेट दिला. प्राचार्य डाॅ. घनश्याम जाधव, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, ॲड. शीतल चव्हाण, काॅ. अरुण ीेणके, स्वातंत्र्यसैनिक शहाजी पाटील, संचालक अशोकराव पाटील, शेषराव पवार, प्राचार्य एस. एन. रेडे, दिलीपराव इंगोले,

उपप्राचार्य डाॅ. संजय अस्वले, डाॅ. विलास इंगळे, प्रा. डी. व्ही. थोरे, उपप्राचार्य जी. बी. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी आदींनी माेरे यांचा सत्कार केला.

Web Title: Celebrate Maere's birthday with various activities