शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 06:16 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर जागा टिकविण्याचे आव्हान

चेतन धनुरेउस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेनेतील ‘तू तू-मैं मैं’ पाहून हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील, असे चित्र उभे केले गेले होते़ त्यातच मोदींचा करिष्मा कायम राहिल्याने जिल्ह्यात अनेक इच्छुकांनी आगामी विधानसभा नजरेसमोर ठेऊन भाजपात प्रवेश केला आहे़ हा ओघ अजूनही कायम आहे़ त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या जिल्ह्यातील भाजपमधून आता उघड-उघड स्वबळाची हाक दिली जात आहे़ असे असले तरी निवडणुकीपूर्वी मित्रपक्ष सेनेकडून तुळजापूरची जागा कायम राखत आणखी एक वाढीव जागा पदरी पाडून घेण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जात असल्याचे स्पष्ट आहे़

पाच वर्षांपूर्वीपर्यंत जिल्ह्यात भाजपचे स्थान नगण्य होते़ युतीत चारही मतदारसंघ हे शिवसेनेच्या वाट्याचे़ २००९ ला एकमेव तुळजापूर भाजपच्या वाट्याला आला आहे़ येथून भाजपचा एकही आमदार विधानसभेत गेला नाही़ हे चित्र बदलण्यासाठी भाजपने सुजितसिंह ठाकूर यांच्या माध्यमातून विधानपरिषद सदस्य दिला़ यानंतर हळुहळु जिल्ह्यात पाय पसरण्यास सुरुवात केली़ आजघडीला सर्वाधिक प्रवेश हे भाजपात होत आहेत़ त्यामुळे साहजिकच भाजपचे बळ वाढले आहे़ याच बळावर भाजपने स्वबळाचीही तयारी ठेवली आहे़ याबाबत आता जाहीर विधानेही केली जावू लागली आहेत़ विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे आहेत़ तर दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेतही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे़ भाजप-सेनेतील संभाव्य बंडखोरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडतील, असे आजचे चित्र असलेतरी भाजप-सेनेला बंडखोरी टाळण्यात यश आल्यास मात्र, वाट खडतर असणार आहे़

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे़ तर सेनेतून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, खासदारांचे भाऊ जयराज राजेनिंबाळकर, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांची नावे चर्चेत आहेत़ स्वतंत्र लढल्यास भाजपातून नितीन काळे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सुरेश पाटील, डॉ़ प्रतापसिंह पाटील यांच्या नावाची चर्चा आहे़ परंडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहूल मोटे हेच पुन्हा उमेदवार असतील़ त्यांच्याविरोधात लढण्यासाठी सेनेकडून जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यासह माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील, सहसंपर्कप्रमुख शंकर बोरकर, सुरेश कांबळे इच्छुक आहेत़ भाजपातून संजय गाढवे तर रासपकडून बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकरांची इच्छा आहे़

तुळजापुरात काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण पुन्हा इच्छुक आहेत़ मात्र, यावेळी माजी जि़प़ अध्यक्ष धीरज पाटील यांनीही दावा ठोकला आहे़ अनिल लबडे यांनीही मागणी केली आहे़ सध्या राष्ट्रवादीत असलेले अशोक जगदाळे, जि़प़ गटनेते महेंद्र धुरगुडे यांनीही तयारी केली आहे़ तर भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी झाली आहे़ देवानंद रोचकरी, सत्यवान सुरवसे, अ‍ॅड़ व्यंकटराव गुंड, रोहन देशमुख, अनिल काळे अशी यादी आहे़ सर्वच पक्षांत येथे बंडखोरी अटळ दिसत आहे़

उमरग्यात विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते़ काँग्रेसकडून येथे तगडा उमेदवार दिला गेला नाही़ त्यामुळे चौगुलेंचा मार्ग सुकर होत गेला़ आता यावेळी काँग्रेसमधून इच्छुकांची संख्या जास्त असली तरी नेमकी उमेदवारी कोणाच्या पदरात पडेल, हे निश्चित नाही़

गत निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार - शिवसेना २। काँग्रेस १। राष्ट्रवादी १

सध्याचे पक्षीय बलाबल - राष्ट्रवादी काँग्रेस २ । काँग्रेस १ । शिवसेना १़

सर्वात मोठा विजय: तुळजापूर : मधुकरराव चव्हाण (काँग्रेस) २९,६१० (पराभव : जीवनराव गोरे, राष्ट्रवादी)

सर्वात कमी मताधिक्याने पराभव : उस्मानाबाद : ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना) १०,८०६़(विजयी : राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019osmanabad-acउस्मानाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस