मोहेकर स्टील इंडस्ट्रीजचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST2021-07-14T04:37:48+5:302021-07-14T04:37:48+5:30

मोहा : येथे मोहेकर स्टील इंडस्ट्रीजचे भूमिपूजन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ...

Bhumi Pujan of Mohekar Steel Industries | मोहेकर स्टील इंडस्ट्रीजचे भूमिपूजन

मोहेकर स्टील इंडस्ट्रीजचे भूमिपूजन

मोहा : येथे मोहेकर स्टील इंडस्ट्रीजचे भूमिपूजन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मोहेकर मल्टिस्टेट व मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन हनुमंत मडके यांनी मोहेकर स्टील इंडस्ट्रीज कारखान्यामध्ये सर्व प्रकारचे पत्रे, नट बोल्ट, खिळे, बायंडिंग वायरचे उत्पादन होणार असून, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगितले. या वेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, मोहाचे सरपंच राजू झोरी, माजी सरपंच बाबासाहेब मडके, मनोज जोशी, विनय सहस्रबुद्धे (आर्किटेक्चर पुणे), सिद्धिविनायक ॲग्रोटेकचे कार्यकारी संचालक गणेश कामठे, मोहेकर मल्टिस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेकर ॲग्रोचे कार्यकारी संचालक संतोष मडके, ग्रामसेवक सी.एन. लोकरे, मंडळ अधिकारी एन.डी. नागटिळक, सलीम मोमीन, पांडुरंग मडके, देवी नंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन अतुल मडके, भारत जोशी तसेच मोहेकर मल्टिस्टेटचे मुख्य कार्यालय अधिकारी श्रीकांत मडके, अतुल मडके, इम्रान शेख तसेच मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजचे कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

110721\46321014img-20210711-wa0023.jpg

मोहेकर स्टिल इंडस्ट्रीज चे भूमिपूजन करताना चेअरमन हनुमंत मडके,डॉ अशोकराव मोहेकर, सरपंच राजु झोरी,आदी मान्यवर दिसत आहेत

Web Title: Bhumi Pujan of Mohekar Steel Industries