शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

'गेलात तिथे सुखी रहा'; काही जणांच्या बाबतीत आमचा निर्णय पक्का - शरद पवार

By सुमेध उघडे | Published: October 19, 2020 11:48 AM

Sharad Pawar NCP 'गेलात तिथे सुखी रहा'; परतण्यास इच्छुक अनेकांच्याबाबतीत शरद पवारांची भूमिका

ठळक मुद्देकाही जणांच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय. परतण्यास इच्छुक अनेकांच्याबाबतीत शरद पवारांची भूमिका

उस्मानाबाद  : सध्या पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहेत. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काही जणांच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय. आता त्यांना पुन्हा घेणे नाही. गेलात तिथे सुखी रहा, अशी भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेत, विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, याची नोंद पक्ष घेत नाही, असे त्यांना वाटत असेल. दुसरा पक्ष त्याची नोंद घेतो असेही त्यांना वाटत असेल, इतकेच बोलून खडसेंच्या पक्षांतरावरील वावड्यावर त्यांनी पूर्ण भाष्य करणे टाळले.

यानंतरही पदावर राहणे, हा त्यांचा निर्णय राज्यपालानी स्वतःच्या पदाची व मुख्यमंत्री पदाची किंमत ठेवावी. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांची कानउघाडणी केलीय. यानंतरही पदावर राहावे वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, अशी अप्रत्यक्ष टीका पवारांनी केली. मुख्यमंत्रीही पाहणी दौऱ्यावर येत आहेत. ते बाहेर पडत नाहीत असे नाही, आम्हीच त्यांना सांगितलंय एका ठिकाणी बसून नियोजन करायला, असे सांगत ठाकरे यांची पाठराखण केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOsmanabadउस्मानाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस