शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी बाधितांना न्याय मिळवून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीची मानहानी होत असते. त्याच्या मानवी हक्कांचे ...

उस्मानाबाद : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीची मानहानी होत असते. त्याच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याच्या आणि सामाजिक न्यायाच्या हेतूने अशा प्रकरणांत अधिकाऱ्यांनी बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीररीत्या सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा समाजकल्याणचे सहायक आयुक्त तथा या समितीचे सदस्य सचिव बी.जी. अरवत, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात एप्रिल २०२१ मध्ये या अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांतील आठ अत्याचारपीडितांना सात लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आल्याची माहिती यावेळी अरवत यांनी दिली. २७ मे २०२१ रोजीच्या बैठकीत मार्च २०२१ अखेर पोलीस तपासावर असलेल्या १४ प्रकरणांचा तपशील ठेवण्यात आला होता. या सर्व प्रकरणांत पोलीस तपास पूर्ण झाला असून, दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यावर या बैठकीत कार्यवाही झाल्याचे सांगण्यात आले.

चौकट.......

अत्याचारपीडितांना २६ लाखांचे साहाय्य

जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते जून २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत खुनाचे पाच, जातीवाचक शिवीगाळीचे ८९, विनयभंगाचे ३३, बलात्काराचे २६, लुबाडणूक, फसवणुकीचा एक तर इतर १४ अशा एकूण १६८ गुन्ह्यांची नोंद झाली. यापैकी १४३ प्रकरणांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असून, १७ प्रकरणे पोलीस तपासावर आहेत. ७ प्रकरणे पोलीस स्तरावर निकाली काढण्यात आली आहेत. तसेच २०२०-२१ मध्ये दाखल गुन्ह्यांपैकी दोषारोप झालेल्या प्रकरणांत, तसेच मे व जून २०२१ अखेर घडलेल्या प्रकरणांतील अत्याचारपीडितांना २६ लाख ६ हजार २५० रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.