सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी तांबारे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST2021-07-30T04:34:13+5:302021-07-30T04:34:13+5:30

डॉ. तांबारे हे मागील दोन दशकांपासून राज्यभर व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवत आहेत. महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात ...

Appointment of Tambare as State President of SAIL | सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी तांबारे यांची नियुक्ती

सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी तांबारे यांची नियुक्ती

डॉ. तांबारे हे मागील दोन दशकांपासून राज्यभर व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवत आहेत. महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात महत्त्वाचे काम केले आहे. येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून जवळपास पंधरा हजार व्यक्तींना व्यसनापासून परावृत्त करण्यात यश मिळवले आहे. याशिवाय आयुष इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स याच्या माध्यमातून संशोधन, समुपदेशन यावर भर दिला आहे. यातून त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर झाले आहेत. शिवाय त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवाय जैविक व सेंद्रीय शेती यातही त्यांचे काम आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले. या वेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आ. राहुल मोटे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनने प्रदेशाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे उपस्थित होते.

Web Title: Appointment of Tambare as State President of SAIL