शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

काेविड चाचण्यांसाठीची अत्याधुनिक मशिनरी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST

वाशी -परंडा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजी जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालयास काेविड प्राेफाईल चाचण्या करण्यासाठी ...

वाशी -परंडा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजी जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालयास काेविड प्राेफाईल चाचण्या करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी देण्यात आली आहे. या मशिनरीचे लाेकार्पण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत व सेनेचे नेते प्रशांत चेडे यांच्या हस्ते ३० एप्रिल राेजी झाले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कपिलदेव पाटील यांनी आढावा बैठकीत कोरोना बाधितांच्या कोरोनाविषयक रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी सेल काउंटर, बायोकेमिस्ट्री अ‍ॅनालायझर आदी साहित्याची गरज नाेंदविली हाेती. या चाचण्या ग्रामीण रुग्णालयात झाल्यास एका रुग्णाचे कमीत कमी चार ते पाच हजार रुपये वाचतील, असे त्यांनी सांगितले हाेते. ही बाब गांभीर्याने घेत आ. सावंत यांनी यंत्रसामग्री मागून घ्या. त्याचे बिल तातडीने दिले जाईल, अशी ग्वाही दिली. यानंतर अवघ्या दाेन दिवसांत प्रयोगशाळेसाठीची आधुनिक मशिनरी दाखल झाली. जीची किंमत सव्वापाच लाख रुपये आहे. थाेडाही विलंब न करता मशिनरी रुग्णांच्या सेवेत दाखल झाली. शनिवारी लोकार्पण सोहळा पार पडला. दरम्यान, सदरील मशिनरीसाेबतच रुग्णालयासाठी १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, कोविड लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मंडप, ५० खुर्च्या स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या आहेत़ कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, शिवहार स्वामी, सतीश शेरकर, विकास तळेकर, धर्मराज जगताप, जिल्हा परिषद सदस्य उद्धवराव साळवी, बाबासाहेब घोलप, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कपिलदेव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी गोवर्धन महिंद्रकर, डॉ़ महावीर कोटेचा, डॉ़ संजिव गरड, डॉ़ अमर तानवडे, डॉ़ सोनाली गाढवे, डॉ़ हिराळे, डॉ़ विनोद पवार यांच्यासह गटविकास अधिकारी विलास खिल्लारे आदी उपस्थित हाेते.

चाैकट....

काेराेनाचे संकट अधिक गंभीर आहे. रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा काळात ग्रामीण रुग्णालय स्तरावर आवश्यक साेयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेतला. स्वखर्चातून प्रयाेगशाळेसाठी अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून दिली. राज्यातील पहिले असे ग्रामीण रुग्णालय असेल, जेथे रक्तांच्या सर्व चाचण्या हाेतील. त्याचा फायदा निश्चित गाेरगरीब जनतेला हाेईल, असा विश्वास जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी व्यक्त केला.