८७ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST2021-02-15T04:28:29+5:302021-02-15T04:28:29+5:30
शिबिराचे उद्घाटन नूतन सरपंच तानाजी वाघमारे यांनी केले. अध्यक्षस्थानी विस्ताराधिकारी अशोक खुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती ...

८७ जणांनी केले रक्तदान
शिबिराचे उद्घाटन नूतन सरपंच तानाजी वाघमारे यांनी केले. अध्यक्षस्थानी विस्ताराधिकारी अशोक खुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नंदा घाडगे उपस्थित होत्या. मागील सात वर्षांपासून कर्मवीर परिवार या उपक्रमाचे आयोजन करीत आहे. यावेळी रक्तदात्यांचा सन्मान तसेच मानव विकास मिशनच्यावतीने आदर्श विस्तार अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक खुळे यांचा, नूतन ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी युवराज खाडे, नागनाथ देशमुख, तानाजी तरंगे, भागवत घोगरे, अर्जुन गुंजाळ, प्रफुल्ल झाडबुके, रामदास होरे, सचिन शेळके, महादेव विटकर, शिवा वाघमारे, धनराज बनसुडे यांची उपस्थिती होती. शिबिरासाठी श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे कर्मचारी उमेश देशमाने, अर्चना गुळवे, अनुराधा फोके, सुप्रिया लगदिवे, ताजुद्दीन सय्यद, नागेश चाबुकस्वार, रणजित चंदनशिव, अविनाश पवार, संतोष वाघमारे, विश्वास वाघमारे, रामराव हुके, कर्मवीर परिवार व शिवजन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.