शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

४ कोटींच्या रुग्णवाहिका प्रस्तावातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेने १३ व १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक, व्याज रकमेतून रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे ...

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेने १३ व १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक, व्याज रकमेतून रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे दिला आहे. मात्र, निर्णयाविना तो प्रलंबित असल्याच्या विषयाकडे शुक्रवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लक्ष वेधले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णवाहिका खरेदीसाठी संबंधितांना तातडीने सूचना करण्याची ग्वाही दिली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळालेल्या १३ व्या वित्त आयोगाची शिल्लक रक्कम व १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याजाची सुमारे ४ कोटींची रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली आहे. या रकमेतून २२ रुग्णवाहिका खरेदी करण्याची मागणी जिल्हा परिषदेने ग्रामविकास खात्याकडे केली आहे. मात्र, ती प्रलंबित राहिल्याचा मुद्दा आ. पाटील यांनी शुक्रवारच्या बैठकीत उपस्थित केला. दरम्यान, यासोबतच उस्मानाबादला विशेषतज्ज्ञ देण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली आहे. या अनुषंगाने बदली आदेश काढले होते. परंतु, केवळ दोनच डॉक्टर रूजू झाले. हे अन्यायकारक असून, जिल्हयातील डॉक्टर्स व विशेषतज्ज्ञांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांशी याबाबत चर्चा करण्याचे व रिक्त पदे भरण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे मान्य केले. विशेषतज्ज्ञांच्या कमतरतेमुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपचार करता यावेत यासाठी टेली आयसीयू सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्याची मागणी केली, ही कार्यवाही लागलीच करण्याची सूचना टोपे यांनी दिली. तिसऱ्या लाटेची तीव्रता, लहान मुलांचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला द्याव्यात, या मागणीवरही टोपे यांनी ते सुरू करण्याचे निर्देश दिले.

नळदुर्गच्या रुग्णालयास जुलैमध्ये निधी...

नळदुर्ग येथील ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत अनेक दिवसांपासून अर्धवट आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सदरील रुग्णालय कार्यान्वित होणे गरजेचे आहे. रुग्णालयाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक ११ कोटी ३८ लाखांचा निधी पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी आ. पाटील यांनी केली. त्यावर जुलै महिन्यात हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.