शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

१२ साखर कारखान्यांकडून ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास साेळा एवढी आहे. परंतु, नुकत्याच सरलेल्या गाळप हंगामात अवघ्या ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास साेळा एवढी आहे. परंतु, नुकत्याच सरलेल्या गाळप हंगामात अवघ्या बारा कारखान्यांचे धुराडे पेटले. या सर्व कारखान्यांनी मिळून सुमारे ७३ लाख ४२ हजार १९२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ऊसगाळपात कळंब तालुक्यातील रांजनी येथील नॅचरल शुगरने बाजी मारली. या कारखान्याने सर्वाधिक आठ लाख आठ हजार ८६० मे.टन उसाचे गाळप केले, तर पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिलने केवळ एक लाख २४ हजार ३९९ मे. टन उसाचे गाळप केले आहे.

एकेकाळी जिल्ह्यातील तेरणा, तुळजाभवानी हे सहकारी साखर कारखाने उसाच्या गाळपात आघाडीवर राहत हाेते. परंतु, मागील काही वर्षात जिल्ह्यात खासगी कारखान्यांचेही माेठ्या प्रमाणात जाळे विस्तारले आहे. सहकार क्षेत्रातील तेरणा, तुळजाभवानी हे दाेन्ही माेठे कारखाने बंद असल्याने सध्या खासगी कारखान्यांची चलती आहे. नुकत्याच सरलेल्या हंगामात खासगी कारखान्यांनीच गाळपात बाजी मारल्याचे दिसून येते. जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून जवळपास साेळा कारखाने आहेत. यापैकी तेरणा, श्री तुळजाभवानी, नृसिंह आणि नितळी येथील जयलक्ष्मी हे चार कारखाने बंद राहिले. उर्वरित बारा कारखान्यांनी मात्र उसाचे गाळप केले. यामध्ये प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या रांजनी येथील नॅचर शुगरने तब्बल आठ लाख आठ हजार ८६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून अव्वल क्रमांक पटकाविला. यानंतर लाेहारा तालुक्यातील खेड येथील सर्वाधिक सहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या ‘लाेकमंगल’ने चार लाख ८४ हजार २२४ मे. टन उसाचे गाळप करून द्वितीय क्रमांक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकावर भैरवनाथ शुगर हा कारखाना आहे. साडेतीन हजार मे. टन गाळप क्षमता असणाऱ्या या कारखान्याने तीन लाख ६४ हजार ४६८ मे.टन. गाळप केले आहे. मुरूम येथील ‘विठ्ठलसाई’ने तीन लाख २८ हजार ७७८, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने तीन लाख तीन हजार ७७६, वाशी येथील शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्याने दाेन लाख २८ हजार १५८, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने दाेन लाख ४० हजार ७६९, बाणगंगा कारखान्याने दोन लाख ८८ हजार ६८६, ‘डीडीएन’ने दोन लाख ४८ हजार २७५, धाराशिव शुगरने तीन लाख ३२ हजार ७९०, कंचेश्वर शुगरने तीन लाख ३१ हजार ४२५ आणि भीमाशंकर शुगरने सर्वात कमी एक लाख २४ हजार ३९९ मे. टन उसाचे गाळप केले. यापैकी चार कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारीमध्येच गुंडाळला गेला, तर उर्वरित आठ कारखान्यांचा हंगाम मार्चमध्ये आटाेपला. बंद असलेले कारखाने पुढील हंगामात सुरू झाल्यास हे चित्र आणखी बदलेल.

चाैकट...

साखर उताऱ्यात दाेन कारखाने पुढे...

उसाचे सर्वाधिक गाळप करण्यात ‘नॅचरल’ने बाजी मारली असली तरी साखर उताऱ्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना व कंचेश्वर शुगरने बाजी मारली आहे. दाेन्ही कारखान्याला प्रत्येकी १०.५५ टक्के उतारा मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर विठ्ठलसाई साखर कारखाना आहे. १०.२२ टक्के एवढा उतारा आहे. तसऱ्या क्रमांकावर नॅचर शुगर कारखाना आहे. ९.६१ टक्के एवढा उतारा मिळाला आहे. शिवशक्तीला ९.३४ टक्के, भाऊसाहेब बिराजदार ९.३०, बाणगंगा ८.७२, डीडीएन ८.५४, भीमाशंकर ९.३९, धाराशिव ९.४९, भैरवनाथ ९.१० तर ‘लाेकमंगल’चा साखर उतारा केवळ ७.९२ टक्के आला आहे.

३८ लाख क्विंटल साखर उत्पादित...

जिल्ह्यातील साेळा पैकी बारा कारखान्यांनी उसाचे गाळप केले. या सर्व कारखान्यांनी मिळून संपूर्ण गाळप हंगामात ३८ लाख ५९ हजार ८४३ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. नॅचरल शुगरने सर्वाधिक सात लाख ७७ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समाेर आले आहे.