१५५ उमेदवार अपात्र

By Admin | Updated: June 11, 2014 00:31 IST2014-06-11T00:00:56+5:302014-06-11T00:31:09+5:30

उस्मानाबाद : पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या ७५० उमेदवारांपैकी ५०५ उमेदवार हजर राहिले़ यातील १५५ उमेदवार मूळ कागदपत्र व इतर चाचण्यांमध्ये अपात्र ठरले तर पात्र ठरलेल्या ३५० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली़

155 candidates ineligible | १५५ उमेदवार अपात्र

१५५ उमेदवार अपात्र

उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलाच्या अस्थापनेवरील १४० पोलिस शिपाईपदासाठी सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या ७५० उमेदवारांपैकी ५०५ उमेदवार हजर राहिले़ यातील १५५ उमेदवार मूळ कागदपत्र व इतर चाचण्यांमध्ये अपात्र ठरले तर पात्र ठरलेल्या ३५० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली़
पोलिस शिपाई भरतीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या ७५० उमेदवारांना मंगळवारी भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले होते़ यातील ५०५ उमेदवारांनी हजेरी लावली तर २४५ जणांनी मंगळवारीही दांडी मारली़ यातील १५५ उमेदवार विविध कागदपत्रांसह उंची, छाती आदी तपासणीत अपात्र ठरले़ पात्र ठरलेल्या ३५० उमेदवारांची लांब उडी, गोळा फेक, पुलअप्स, १०० मीटर धावणे इत्यादी शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या़ या उमेदवारांची बुधवारी सकाळी विमानतळाजवळील मार्गावर पाच किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे़
आॅनलाईन अर्ज भरलेल्या क्रमांक १४१०१२००००४ ते १४१०१२०४७४४ क्रमांका पर्यंतच्या ७५० उमेदवारांना बुधवारी भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले आहे़ उमेदवारांनी सकाळी ६ ते १० या वेळेत मूूळ कागदपत्रांसह सत्यप्रती घेवून हजर रहावे़ ज्यांच्याकडे प्रवेशपत्र आहे, अशांनाच प्रवेश देण्यात येणार असून, उमेदवारांनी सर्व कागदपत्रे सोबत आणावीत असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 155 candidates ineligible