शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अद्यापही १३६ विद्यार्थ्यांना स्वाधारची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:16 IST

उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात अर्ज करून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ...

उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात अर्ज करून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित केली आहे. निधीअभावी ४१० विद्यार्थी दीड वर्षापासून निर्वाह भत्यापासून वंचित होते. जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने २७४ विद्यार्थ्यांना भत्ता मिळाला आहे. मात्र, अद्यापही १३६ विद्यार्थी भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत दहावीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह व इतर खर्च भागविण्यासाठी दरवर्षी ५१ हजार रुपये भत्ता देण्यात येतो. दोन टप्प्यात विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण करण्यात येत असते. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यात ७१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील ३०० विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरले होते. तर ४१० विद्यार्थी पात्र ठरले हाते. शैक्षणिक वर्ष संपण्याच्या तोंडावर राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यामुळे शासनाने योजनावरील निधी वर्ग करणे तातडीने थांबवून कोरोना उपाययोजनांवर भर दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. सामाजिक न्याय विभागाने पहिल्या टप्प्यात १ कोटी ११ लाख ७७ हजार ५१० रुपयांचा निधी २७४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. दोन वर्षानंतर भत्त्याची रक्कम मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तर अद्यापही १३६ विद्यार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

विद्यार्थ्यांच्या भत्तासाठी हवे ६० लाख रुपये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात ७१० अर्ज सहाय्यक समाजकल्याण आयुक्त कार्यालयाकडे दाखल झाले होते. यातील ४१० विद्यार्थी पात्र ठरले होते. पहिल्या टप्प्यात २७४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर भत्त्याची रक्कम वर्ग झाली आहे. १३६ विद्यार्थी भत्ता रखडला आहे. या विद्यार्थ्यांसाठी ६० लाख रुपयांच्या निधीची मागणी सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाने राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे केली आहे.