Zomato's delivery girl has misbehaved with on duty traffic police then reached the jail | झोमॅटोच्या डिलिव्हरी गर्लने पोलिसांशी हुज्जत घातली अन् थेट तुरुंगात पोहोचली
झोमॅटोच्या डिलिव्हरी गर्लने पोलिसांशी हुज्जत घातली अन् थेट तुरुंगात पोहोचली

ठळक मुद्दे प्रियांका मोगरे (२७) असं या तरुणीचं नावभा. दं. वि. ३५३, ३९३, २९४, ५०४ आणि ५०६ अन्वये वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी मुंबई - काही दिवसांपूर्वी नो पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलिसांची हुज्जत घालणाऱ्या झोमॅटो डिलेव्हरी गर्लचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. प्रियांका मोगरे (२७) असं या तरुणीचं नाव असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. भा. दं. वि. ३५३, ३९३, २९४, ५०४ आणि ५०६ अन्वये वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वाशीतील पाम बीच रोडवर झोमॅटो डिलेव्हरी करणाऱ्या तरुणीने नो पार्किंगमध्ये बाईक लावल्याप्रकरणी दंड आकारणाऱ्या वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत हुज्जत घातली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद करून पोलिसांना बोलावून तिला त्यांच्या ताब्यात दिले. 

Web Title: Zomato's delivery girl has misbehaved with on duty traffic police then reached the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.