मुली टोमणे मारतात म्हणून आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुकवर लिहिली होती त्याने पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:30 IST2021-03-30T16:28:26+5:302021-03-30T16:30:13+5:30
रविश अग्रवाल नावाच्या तरूणाने मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यात त्याने लिहिले की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुली त्याला आईवरून शिव्या देतात.

मुली टोमणे मारतात म्हणून आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुकवर लिहिली होती त्याने पोस्ट!
न्यू आग्र्यामध्ये एका तरूणाने आधी फेसबुकवर सुसाइड पोस्ट लिहिली आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. जेव्हा तरूणाच्या ओळखीतील काही लोकांना हे समजलं तर त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना तरूण गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सांगितले जात आहे की, तरूण काही मुलींकडून होत असलेल्या कमेंटमुळे टेंशनमध्ये होता.
'मुली आईवरून देत होत्या शिव्या'
रविश अग्रवाल नावाच्या तरूणाने मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यात त्याने लिहिले की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुली त्याला आईवरून शिव्या देतात. इतकंच नाही तर त्याच्या विरोधात काही खोट्या केसेसही दाखल केल्या गेल्या. त्याने लिहिले की, आता सीतापूरमध्ये एक खोटी केस दाखल केली आहे. तो तर सीतापूरला कधी गेलाही नाही. त्याने लिहिले की, तो मानसिक रूपाने फार त्रासला आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे. त्याच्या मृत्यूला दोन शेजारच्या तरूणी आणि त्यांच्या दोन मैत्रिणी जबाबदार आहेत.
पोलीस काय म्हणाले?
पोलिसांनी सांगितले की, रवीश अग्रवा नावाचा तरूण २५ वर्षांचा आहे. त्याने फेसबुकवरू नोट पोस्ट केली होती. त्याने लिहिले होते की, तो आत्महत्या करत आहे. अशी सूचना पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तो गंभीर स्थितीत आढळून आला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तरूणाने पोलिसांना सांगितले की, काही शेजारी लोक त्याला त्रास देतात आणि त्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करतात. याला कंटाळून त्याने हे पाउल उचलले आहे. त्याने काही लोकांची नावेही घेतली. त्यात दोन मुली आणि त्यांच्या मैत्रिणींचाही समावेश आहे.