नाशिक शहरात युवकाचा दगडाने ठेचून खून, तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2023 11:00 IST2023-01-21T10:59:52+5:302023-01-21T11:00:56+5:30
घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून खून झालेल्या युवकाची ओळख पटली नसल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले.

नाशिक शहरात युवकाचा दगडाने ठेचून खून, तपास सुरू
- संदीप झिरवाळ
नाशिक- शहरातील पंचवटी येथीलपेठरोड वरील हमालवाडी (तुळजाभवानी नगर) येथे शनिवारी (दि.21) सकाळी एका 25 ते 30 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून खून झालेल्या युवकाची ओळख पटली नसल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले असून पालकमंत्री दादा भुसे यांनी कालच गुन्हेगारी मोडून काढली जाईल असे सांगितले होते. मात्र 24 तासातच ही घटना घडली आहे.