लग्नाचा प्रस्ताव घेऊन पोहोचलेल्या तरूणाने होणाऱ्या नवरीसोबत केला रेप, एका लग्नात झाली होती भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:16 IST2022-01-31T17:16:32+5:302022-01-31T17:16:57+5:30

दोन्ही परिवारही लग्नासाठी  तयार झाले. त्यानंतर तरूणाने त्याच्या होणाऱ्या नवरीसोबत रेप केला. २ वर्षांनंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. 

Youth raped girl after meeting at function offered marriage | लग्नाचा प्रस्ताव घेऊन पोहोचलेल्या तरूणाने होणाऱ्या नवरीसोबत केला रेप, एका लग्नात झाली होती भेट

लग्नाचा प्रस्ताव घेऊन पोहोचलेल्या तरूणाने होणाऱ्या नवरीसोबत केला रेप, एका लग्नात झाली होती भेट

छत्तीसगढच्या कोरबामध्ये एका तरूणाने तरूणीला लग्नाचं आमिष देऊन तिच्यासोबत रेप केला. पोलिसांनी तक्रारीनंतर २४ तासात आरोपीला अटक केली. नातेवाईकच्या लग्नात गेलेल्या तरूणीला तिच्याच जातीच्या एका तरूणाने लग्नाची मागणी घातली होती. दोन्ही परिवारही लग्नासाठी  तयार झाले. त्यानंतर तरूणाने त्याच्या होणाऱ्या नवरीसोबत रेप केला. २ वर्षांनंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. 

कोरबाच्या माणिकपूर पोलिसांनी आरोपील अटक केली. पोलीस अधिकारी मयंक मिश्रा म्हणाले की, एक तरूणी साधारण ४ - ५ वर्षाआधी चांपामध्ये एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेली होती. याच लग्नात तिच्याच जातीचा एक तरूण हिमांशु विश्वकर्मासोबत तिची भेट झाली. त्यानंतर त्याने तरूणीसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत फोनवर बोलणं सुरू केलं. दोघांनी लग्नाविषयी चर्चा केली. फोनवरच त्याने तरूणीच्या कुटुंबियांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. गेल्या १४ सप्टेंबर २०१९ ला हिमांशू फिरण्याच्या बहाण्याने तरूणीच्या घरी पोहोचला. यावेळी लवकरच लग्न करू असं सांगत त्याने तरूणीवर रेप केला. 

साधारण ९ महिन्यांनंतर तो पुन्हा तिच्या घरी गेला. तरूणीच्या आईला भेटून तरूणीचं दुसऱ्या जागी लग्न ठरवू नका असं त्याने सांगितलं. पुन्हा त्याने तरूणीवर रेप केला. असं करत दोन वर्ष झाल्यावरही त्याने लग्न केलं नाही. तरूणीने दबाव टाकला तर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तरूणीने पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी हिमांशुला अटक केली. आता पुढील कारवाई सुरू आहे.
 

Web Title: Youth raped girl after meeting at function offered marriage