पाकिस्तान झिंदाबादच्या समर्थनार्थ WhatsApp स्टेटस टाकले, गावकऱ्यांच्या गदारोळानंतर केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:37 PM2022-05-18T20:37:15+5:302022-05-18T20:41:42+5:30

Sedition Case : याप्रकरणी स्टेशन प्रभारी बोरासी म्हणाले की, तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल.

youth posted WhatsApp status in support pakistan, arrested after complaining by villagers | पाकिस्तान झिंदाबादच्या समर्थनार्थ WhatsApp स्टेटस टाकले, गावकऱ्यांच्या गदारोळानंतर केली अटक

पाकिस्तान झिंदाबादच्या समर्थनार्थ WhatsApp स्टेटस टाकले, गावकऱ्यांच्या गदारोळानंतर केली अटक

googlenewsNext

शाजापूर - उज्जैनमध्ये एका तरुणाने आपल्या WhatsApp स्टेटसवर 'पाकिस्तान झिंदाबादच्या नारे देणारा' व्हिडिओ टाकला आणि लिहिलं की, आणखी तीव्रतेने बोला. हिंदू संघटना आणि समाजातील लोकांनी हा स्टेट्स पाहिल्यावर लोकांमध्ये नाराजी पसरली. याप्रकरणी दिल्लोड गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने लालघाटी पोलीस ठाणे गाठून स्थानक प्रभारी मीना बोरासी यांना निवेदन देऊन संबंधित तरुणावर देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी स्टेशन प्रभारी बोरासी म्हणाले की, तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल.

तक्रार देण्यासाठी आलेले तरुण आणि स्टेशन प्रभारी यांच्यात बाचाबाची झाली. या तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे तरुणांनी सांगितले. दिल्लोड येथील अधिकारी शाह यांनी त्यांच्या WhatsApp स्टेटसवर व्हिडिओ टाकल्याचे या तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. हा व्हिडिओ उज्जैनमधील 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांचा होता. तरुणाने स्टेटसखाली लिहिले, जोरात बोला, आणि वेगाने बोला.

स्टेटस पाहून दिल्लोड येथील अजय याने त्याला व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. यावर त्याने अजयला शिवीगाळ करत मी काढणार नाही, असे सांगितले. अजयच्या समोरच त्याने घोषणा देण्यास सुरुवात केली आणि व्हिडिओ काढला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार करण्यासाठी आलेले लोक पोलीस ठाण्यात उभे होते. स्टेट्स ठेवणाऱ्या अधिकारी असलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १५३बी आणि २९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

क्राइम :रात्री शेतात लपून 6 जण करत होते 'हे' घाणेरडे काम, पोलिसांना पाहून लागले पळू

हिंदू जागरण मंचचे जिल्हाध्यक्ष अनूप किरकिरे यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भारतात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान झिंदाबाद बोललेच पाहिजे. पाकिस्तानला पाठिंबा देण्याची मानसिकता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही.

Web Title: youth posted WhatsApp status in support pakistan, arrested after complaining by villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.