रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी

रिषभ पंतची ( Rishabh Pant) वादळी खेळी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 09:34 PM2024-04-24T21:34:29+5:302024-04-24T21:34:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: RISHABH PANT scored 88* runs (43) with 5 fours and 8 sixes, he SMASHED 2,WD,6,4,6,6,6 AGAINST MOHIT, Watch Video | रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी

रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: रिषभ पंतची ( Rishabh Pant) वादळी खेळी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पाहायला मिळाली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या टीम इंडियासाठी रिषभने आज त्याची दावेदारी सांगितली. त्याने मोहित शर्माने टाकलेल्या २०व्या षटकात २,१w,6,4,6,6,6 अशा ३१ धावा जोडल्या. आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक वेळा २० किंवा त्यापेक्षा धावा चोपणाऱ्या भारतीयांमध्ये रिषभने ( ८) रोहित शर्माशी बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनी ( १०) या विक्रमात पुढे आहे. रिषभची आजची फटकेबाजी ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दावेदारी सांगणारी ठरली. त्याने  ४३ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी केली.


पृथ्वी शॉ ( ११), जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( २३) व शे होप ( ५ ) यांना संदीप वॉरियरने माघारी पाठवले. पण, रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ६८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या.  अक्षरने ४३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावा केल्या. त्रिस्तान स्तब्स डग आऊटमधूनच सेट होऊन आला आणि त्याने स्तब्स ७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. रिषभने २०व्या षटकात २,१w,६,४,६,६,६ अशी तुफान फटकेबाजी केली आणि संघाला ४ बाद २२४ धावांपर्यंत पोहोचवले. दिल्लीने शेवटच्या १० चेंडूंत ५० धावा जोडल्या.  

IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा:
३७९ - विराट कोहली
३४९ - ऋतुराज गायकवाड
३४२ - रिषभ पंत
३२४ - ट्रॅव्हिस हेड
३१८ - रियान पराग
३१४ - संजू सॅमसन
३११ - शिवम दुबे
३०३ - रोहित शर्मा


गुजरातचा गोलंदाज मोहित शर्माने स्वतःच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला. त्याने आज ४ षटकांत ७३ धावा दिल्या आणि त्यामुळे आयपीएल इतिहासातील ही सर्वात महागडी स्पेल ठरली. २०१८ मध्ये बसील थम्पाने RCB विरुद्ध ७० धावा दिल्या होत्या. 
 

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: RISHABH PANT scored 88* runs (43) with 5 fours and 8 sixes, he SMASHED 2,WD,6,4,6,6,6 AGAINST MOHIT, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.