अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं 

पॉवर प्लेमध्ये धक्के बसल्यानंतर कर्णधार रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी शतकी भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सला सावरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 09:05 PM2024-04-24T21:05:46+5:302024-04-24T21:12:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: AXAR PATEL ( 66 ), Rishabh Pant (88* ) & Tristan Stubbs (26* ); DC set 225 target to GT       | अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं 

अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: पॉवर प्लेमध्ये धक्के बसल्यानंतर कर्णधार रिषभ पंतअक्षर पटेल यांनी शतकी भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सला सावरले. गुजरात टायटन्सच्या संदीप वॉरियर्सने पहिल्या सहा षटकांत DC चे आघाडीचे तीन फलंदाज माघारी पाठवले. नूर अहमद व राशिद खान यांनी अफलातून झेल घेतले. पण, रिषभ व अक्षर या जोडीने GT ला सडेतोड उत्तर दिले. त्रित्सान स्तब्सची फटकेबाजी पाहून गुजरात स्तब्ध झाले. 

पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज

प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपडणारे गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ समोरासमोर आले आहेत. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि संदीप वॉरियरने पॉवर प्लेमध्ये DC ला तीन धक्के दिले. दिल्लीने पृथ्वी शॉ याच्यासोबत जॅक फ्रेझर-मॅकगर्क याला सलामीला पाठवले. त्याने आक्रमक फटकेबाजी करून २३ धावा जोडल्या, परंतु संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. पृथ्वी ( ११) आणि शे होप ( ५) यांचे अनुक्रमे नूर अहमद व राशिद खान यांनी अविश्वसनीय झेल घेतले. दिल्लीला ४४ धावांत ३ धक्के बसले. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलकडून यजमानांना आशा होती. 


रिषभ पंत व अक्षर यांनी ६५ चेंडूंत शतकीय भागीदारी पूर्ण केली. अक्षरने मिळालेल्या बढतीचं सोनं करताना ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रिषभनेही खणखणीत फटकेबाजी करून IPL 2024 मध्ये तीनशे धावांचा टप्पा ओलांडला. गुजरातच्या फिरकीवर अक्षरचा प्रहार पाहण्यासारखा होता. आतापर्यंत फिरकी हीच गुजरातचे बलस्थान राहिले आहे. १७व्या षटकात अक्षरने नूरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचले, परंतु शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अक्षरने ४३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावा केल्या आणि रिषभसह ६८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या.  

त्रिस्तान स्तब्स डग आऊटमधूनच सेट होऊन आला आणि पहिल्याच चेंडूवर सुरेख चौकार खेचला. रिषभने सिक्सने त्याची फिफ्टी पूर्ण केली. यंदाच्या पर्वातील हे त्याचे तिसरे अर्धशतक ठरले. स्तब्सने १९व्या षटकात ४,६,४,६ अशा २२ धावा कुटल्या.  स्तब्स ७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. रिषभने २०व्या षटकात २,१w,६,४,६,६,६ अशी तुफान फटकेबाजी केली आणि संघाला ४ बाद २२४ धावांपर्यंत पोहोचवले. रिषभने ४३ चेंडूंत  ५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८८ धावा केल्या. 

 

Web Title: IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: AXAR PATEL ( 66 ), Rishabh Pant (88* ) & Tristan Stubbs (26* ); DC set 225 target to GT      

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.