शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

लव्ह ट्रँगलमुळे तरुणाची हत्या; मृतदेह ३ दिवस फ्रीजरमध्ये लपवला, पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:57 IST

त्रिपुरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह फ्रिजरमध्ये लपवण्याचा प्रकार समोर आला आहे.

Tripura Murder Case: देशभरात सध्या राजा रघवुंशी हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनमने हत्या केली होती. मेघालयातील राजा रघुवंशी हत्याकांड ताजे असतानाच शेजारच्या त्रिपुरा येथे एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आईस्क्रीम फ्रीजरमध्ये आढळल्याने खळबळ उडाली.  त्रिपुरात लव्ह ट्रँगलमुळे या तरुणाची हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे एका २० वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र मुलीचा चुलत भाऊही तिच्यावर प्रेम करत होता. याच प्रेमप्रकरणातून २८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह आईस्क्रीम फ्रीजरमध्ये लपवण्यात आला.

त्रिपुराची राजधानी असलेल्या आगरतळापासून १२० किमी अंतरावर असलेल्या गंडाचेरा बाजारात हा सगळा प्रकार घडला. शरीफुल इस्लामची गळा दाबून हत्या करुन त्याचा मृतदेह आईस्क्रीम फ्रीजरमध्ये लपवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर आणि त्याच्या आई वडिलांसह सहा जणांना अटक केली आहे. शरीफुल इस्लाम हा आगरतळा स्मार्ट सिटी प्रकल्पात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. त्याचे २० वर्षीय तरुणीची प्रेमसंबंध होते. दुसरीकडे, तरुणीचा चुलत भाऊ डॉ. दिबाकर साहा (२८) हा देखील तिच्यावर प्रेम करत होता. या लव्ह ट्रँगलमुळे, दिबाकरने शरीफुलला संपवण्याचा कट रचला. नुकतेच भांडण झाल्यापासून शरीफुल आणि तरुणी एकमेकांशी बोलत नव्हते आणि दिबाकरला याची माहिती मिळाली.

८ जूनच्या रात्री दिबाकरने शरीफुलला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने दक्षिण इंद्रनगर येथील जॉयदीप दासच्या घरी बोलावले. तिथे पोहोचताच दिबाकरने त्याचे साथीदार जॉयदीप दास (२०), अनिमेश यादव (२१) आणि नबनिता दास (२५) यांच्यासह शरीफुलचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरला. दिबाकरने ही बॅग दोन दिवसांपूर्वीच खरेदी केली होती. ९ जून रोजी दिवाकरचे आई वडील दीपक साहा (५२) आणि देबिका साहा हे गंडाचेराहून आगरतळा येथे आले. त्यांनी बॅग गंडाचेरा येथे आणली आणि शरीफुलचा मृतदेह  दुकानातील आईस्क्रीम फ्रीजरमध्ये लपवून ठेवला.

शरिफुलच्या कुटुंबाने पोलिसांकडे तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, शरीफुल आरोपी दिवाकरच्या घरी गेल्याचे समोर झाले. पोलिसांनी दिवाकरची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि मृतदेह फ्रिजमध्ये असल्याचे सांगितले.  सखोल तपासानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री दिबाकर साहा, दीपक साहा, देबिका साहा, जॉयदीप दास, अनिमेश यादव आणि नवनीता दास या सहा आरोपींना अटक केली. पोलिसांनी बुधवारी दुपारी गंडाचेरा इथल्या फ्रीजरमधून मृतदेह बाहेर काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTripuraत्रिपुराPoliceपोलिस