लवळे येथे दसऱ्याच्या दिवशी तरुणाचा भरदिवसा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:19 IST2019-10-09T17:14:26+5:302019-10-09T17:19:27+5:30

नवीन गाडीला ट्रॅक्टर आडवा लावून गाडी थांबवली व त्याला गाडीच्या बाहेर ओढून त्याच्यावर तलवारी व कोयत्याने सपासप वार केले...

Youth murdered in day at Lavale | लवळे येथे दसऱ्याच्या दिवशी तरुणाचा भरदिवसा खून

लवळे येथे दसऱ्याच्या दिवशी तरुणाचा भरदिवसा खून

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील लवळे येथे दसऱ्याच्या सणाच्या दिवशी भरदुपारी प्रतीक प्रकाश सातव (वय २८ वर्ष रा. लवळे ) या तरुणावरती तलवार व कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना लवळे (ता,मुळशी ) येथे भर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये पाच स्थानिक व दोन अज्ञात आरोपींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

पौडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवळे येथील राऊतवाडी ते भरे गाव या दरम्यान असलेल्या रस्त्यावरून मयत प्रतिक तसेच त्याचे अन्य दोन मित्र नवीन स्विफ्ट गाडी घेऊन सावता मळा येते राहत असलेल्या घरी येत होते.  त्याचवेळी त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या मारेकर्‍यांनी रस्त्याच्या मध्यभागी प्रतिक याच्या नवीन गाडीला ट्रॅक्टर आडवा लावून गाडी थांबवली व त्याला गाडीच्या बाहेर ओढून त्याच्यावर तलवारी व कोयत्याने सपासप वार केले.  तेव्हा या हल्ल्यामध्ये प्रतिक सातव याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रतीक याचा मृत्यूदेह पौड येथील शासकीय रुग्णालया मध्ये शव विच्छेदनासाठी नेण्यात आला.

तेव्हा घडलेल्या घटनास्थळी हवेलीच्या उपविभागीय  पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील,पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अशोक धुमाळ व त्यांचे इतर सहकारी कर्मचारी यांनी तात्काळ भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले, आरोपींची नावे निष्पन्न झाले असून या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तरी आमच्याकडून लवकरात लवकर या आरोपींच्या मुसक्या आवळ्या जातील. 

 

Web Title: Youth murdered in day at Lavale