youth murder who going solve issue of hotel bill | हॉटेलमधील बिलाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून
हॉटेलमधील बिलाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

पिंपरी : हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाचे अपहरण केले. त्यानंतर तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून खून केला. ही घटना सोमवारी पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली. 
 हितेश मुलचंदानी (वय २३, रा. डी.ब्लॉक, पिंपरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी चार इसमांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशच्या मित्राचे कासारवाडी येथील हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाले. किरकोळ वादाचे रुपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याचा मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत हॉटेलमध्ये धाव घेतली. हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने गाडीत बसवले. 
 चौघांनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी होऊन हितेशचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत. 


Web Title: youth murder who going solve issue of hotel bill
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.