शिक्रापूर येथे दगडाने ठेचून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:28 IST2019-04-17T21:27:21+5:302019-04-17T21:28:56+5:30

पाबळ (ता. शिरूर) पासून तीन किलोमीटर अंतरावर पाबळच्या हद्दीत वरुडे-वाफगाव रोडच्या चारीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळला.

youth murder by stone stroke in Shikrapur | शिक्रापूर येथे दगडाने ठेचून तरुणाची हत्या

शिक्रापूर येथे दगडाने ठेचून तरुणाची हत्या

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील पाबळ वरुडे रोडवर वाफगावनजीक रस्त्यावर अज्ञात युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. ‘अर्जुन तानाजी वाजगे’ असे या युवकाचे नाव असून तो नारायणगावमध्ये मोबाईल शॉपी चालवत होता, अशी माहिती काही सूत्रांनी पोलिसांना दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पाबळ (ता. शिरूर) पासून तीन किलोमीटर अंतरावर पाबळच्या हद्दीत वरुडे-वाफगाव रोडच्या चारीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर निळ्या रंगाची पँट व काळ्या रंगाचे जर्किन आहे. सुमारे पंचवीस वर्षांच्या या युवकाच्या हातावर ‘अभिमन्यू’ नाव गोंदलेले आहे. 
तरुणाला दगडाने मारलेल्या जखमा आहेत. मृतदेहाजवळ मद्याची बाटली आढळून आली आहे. त्यामुळे दारू प्यायल्यानंतर झालेल्या भांडणातून ही  हत्या झाल्याचा संशय आहे. 
पाबळ गावच्या पोलीसपाटील सविता रत्नपारखी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर वैरागकर, गणेश वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल विलास आंबेडकर, दत्तात्रय शिंदे, भास्कर बुधवंत अधिक तपास करीत आहेत. 
 

Web Title: youth murder by stone stroke in Shikrapur