वडगाव बुद्रुक येथे खुन करुन मृतदेह जाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 13:13 IST2020-03-11T12:59:58+5:302020-03-11T13:13:34+5:30
जळालेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

वडगाव बुद्रुक येथे खुन करुन मृतदेह जाळला
पुणे : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज परिसरतील टेकडीवर तरुणाचा खुन करुन मृतदेह जाळून टाकल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. या तरुणाची अंदाजे वय २५ ते २७ वर्षे असून त्याची अजून ओळख पटलेली नाही.
सिंहगड रस्त्यावरील वडगांव बुद्रुक येथे एका तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसल्याची माहिती एका नागरिकाने फोन करून पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली असता जळालेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. तरुणाचे डोके दगडाने ठेचून त्याचा खुन करण्यात आला असून त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्यात आला असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सिंहगड रोड पोलीस तरुणांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.