शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

अंगावर पेट्रोल ओतून तरुणाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 9:30 PM

शेंदोळा खुर्द येथील घटना; थरार मोबाईलमध्ये कैद

ठळक मुद्देशुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.सतीश नारायण सावरकर (२८, रा. शेंदोळा खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

तिवसा (अमरावती) : तालुक्यातील आदर्श दत्तक गाव शेंदोळा खुर्द येथे एका २८ वर्षीय युवकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.सतीश नारायण सावरकर (२८, रा. शेंदोळा खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मोलमजुरी करीत होता. सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातील एका तरुणानेही अशाच प्रकारे पेट्रोल ओतून आत्महत्या केली होती. सतीशला दारूचे व्यसन होते. तो शुक्रवारी सकाळपासूनच पेट्रोल ओतून आत्महत्या करणार असल्याचे सांगत सुटला. आपण सायंकाळी ७ वाजता गावातील राष्ट्रीय महामार्गाखालील बोगद्याजवळ आत्महत्या करू, असे त्याने गावातील काही जणांना सांगितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.  दारूचे व्यसन असल्याने सतीश हा नेहमीच मनोरुग्णासारखा वागायचा. त्याने गावातील पुलाच्या बोगद्याजवळ स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतले आणि पेटवून घेतले.  काही मिनिटांत त्याचा जागीच कोळसा झाला. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत तिवसा पोलिसांनी तपास आरंभला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसAmravatiअमरावती