Youth arrested for threatening to kill Narendra modi and assam finance minister | नोकरीसाठी नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक 

नोकरीसाठी नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक 

ठळक मुद्देनलबारी जिल्ह्यातील बोरभाग येथूल या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याचं नाव लिंटू किशोर सर्मा असं आहे. हिमंता बिस्वा सर्मा यांचे प्राण वाचवायचे असेल तर त्यांनी मला तत्काळ नलबारी उपायुक्त कार्यालयात नोकरी द्यावी, असे लिंटू किशोर सर्मा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसाममधील मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला आसाम पोलिसांनी अटक केली आहे. नलबारी जिल्ह्यातून या तरुणाला अटक करण्यात आली आहे. नलबारी जिल्ह्यातील बोरभाग येथूल या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याचं नाव लिंटू किशोर सर्मा असं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे अर्थमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सर्मा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार किशोरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये हिमंता बिस्वा सर्मा यांचा 2021 मधील निवडणुकीच्या बैठकीत मृत्यू होणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आलं आहे. तसेच त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक विशाल सार्वजनिक सभा आसामच्या गुवाहाटीमध्ये आयोजित केली जाईल. दहशतवादीचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, मात्र हिमंता बिस्वा सर्मा मारले जातील. हिमंतांचे आयुष्य आता माझ्या हातात आहे. हिमंता बिस्वा सर्मा यांचे प्राण वाचवायचे असेल तर त्यांनी मला तत्काळ नलबारी उपायुक्त कार्यालयात नोकरी द्यावी, असे लिंटू किशोर सर्मा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Youth arrested for threatening to kill Narendra modi and assam finance minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.