शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

नागरकोईल एक्स्प्रेसच्या इंजिनवर युवकाने भिरकावला दगड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 8:56 PM

खंडाळा घाटातील स्टेशन ठाकुरवाडी दरम्यानची घटना; कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने केला निषेध

ठळक मुद्देएका युवकाने रेल्वे रुळांमधील दगड गाडीच्या इंजिनच्या दिशेने भिरकवल्यामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता

डोंबिवली - पुणे दिशेकडुन मुंबई दिशेला जाणा-या नागरकोईल एक्स्प्रेस ह्या गाडीच्या इंजिनवर एका तरुणाने दगड भिरकावल्याने रेल्वे इंजिनची समोरील काच फुटल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ७.११ च्या सुमारास घडली. या घटनेमध्ये गाडीचे पायलट थोडक्यात बचावले. खंडाळा घाटातील ठाकुरवाडी येथे सिग्नलला थांबलेल्या प्रगती एक्स्प्रेस मधील आठ ते दहा युवक रेल्वे लाईन मध्ये उतरले होते, त्याचदरम्यान तेथून नागरकोईल एक्स्प्रेस ही गाडी जात असताना एका युवकाने रेल्वे रुळांमधील दगड गाडीच्या इंजिनच्या दिशेने भिरकवल्यामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती पायलटनेच दिल्याचे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सांगितले.त्या अपघातात पायलट जखमी झाले असते तर फार मोठा अनर्थ घडला असता. समोरुन दगड मारणारा युवक हा पेहरावाने सुशिक्षित वाटत होता, त्याने निळा व सफेद रंगाचे पट्टे असलेला चौकटीचा शर्ट घातला होता तसेच सगळया युवकांच्या पाठीवर प्रवाशी सॅकही होती, असे वर्णन नागरकोईलच्या पायलटने केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रभाकर करंजकर यांनी दिली. राष्ट्रीय संपत्तीचे, मालमत्तेचे नुकसान वा त्यास हानी पोहचवणा-या वृत्तीचा कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन जाहिर निषेध करत असल्याचे ते म्हणाले. ही घटना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी असे कृत्य करणा-या युवकांना ओळखत असल्यास संबंधितांची माहिती रेल्वे प्रशासनाला द्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अशाप्रकारे समाजातील विकृत बाबींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे असल्याचे मत करंजकर यांनी व्यक्त केले.या घटनेसंदर्भात कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसdombivaliडोंबिवली