प्रपोज डेच्या दिवशी प्रेयसीला भेटू न दिल्याने धाकट्या भावाने मोठ्या भावाची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 20:44 IST2022-02-11T20:43:12+5:302022-02-11T20:44:25+5:30
Murder Case : हत्येच्या आरोपाखाली धाकट्या भावाला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

प्रपोज डेच्या दिवशी प्रेयसीला भेटू न दिल्याने धाकट्या भावाने मोठ्या भावाची केली हत्या
मध्य प्रदेशातील गुना येथे प्रेमसंबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारणावरून एका धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केली. कारण मोठ्या भावाने लहान भावाला प्रेयसीला भेटण्यापासून रोखले होते. हत्येच्या आरोपाखाली धाकट्या भावाला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
गुनाचे एसपी राजीव कुमार मिश्रा यांनी सांगितले की, सिटी कोतवाली भागातील मठकरी कॉलनीत भरदिवसा खून झाला. एफएसएल आणि पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले असता किशोर सचदेवा या मृताचा लहान भावाने हे दुष्कृत्य केल्याचं समोर आले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी किशोर सचदेवा आणि त्याचा मोठा भाऊ राजू यांचे लग्न झाले नव्हते. दोन्ही भाऊ एकत्र राहत होते.
लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली
काही दिवसांपूर्वी किशोरला एक मुलगी भेटली. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. प्रपोज डेच्या दिवशी आरोपी आपल्या प्रेयसीला भेटायला जात होता. पण मोठा भाऊ राजू याने त्याला अडवल्याने किशोरने आपल्या मोठ्या भावाचा गळा काचेच्या बाटलीने चिरला. यानंतर आरोपी अल्पवयीन घरात ठेवलेली रक्कम घेऊन ग्वाल्हेरला पळून गेला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली
पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी किशोरला अटक केली. मृत राजूला दारूचे व्यसन होते, त्याचा खर्चही किशोर उचलत होता. आरोपीला अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.