ठाण्यातील फेसबुक मित्राकडून पुण्यात तरुणीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 20:05 IST2019-09-18T20:04:45+5:302019-09-18T20:05:58+5:30
फेसबुक मित्राने वेळोवेळी फिर्यादीला माझ्याशी संबंध ठेव; अन्यथा मी काहीही करून घेईल, अशी धमकी दिली.

ठाण्यातील फेसबुक मित्राकडून पुण्यात तरुणीचा विनयभंग
हिंजवडी : फेसबुकवरील मित्राने वेळोवेळी फोनवरून तसेच पाठलाग करून रस्त्यात थांबवून विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. १५) रात्री सव्वानऊच्या सुमारास पुण्यातील सुसगाव येथे घडली. स्री अत्याचार केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २४ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रताप शिंदे (रा. ठाणे) या फेसबुक मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिंदे हा महिलेचा फेसबुकवरील मित्र आहे. त्याने वेळोवेळी फिर्यादीला माझ्याशी संबंध ठेव अन्यथा मी काहीही करून घेईल, अशी धमकी दिली. रविवारी रात्री सुसगाव येथे महिलेला रस्त्यात थांबवून विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.