The young woman booked an Uber for a safe trip; The driver's started masturbation in front of her | सुरक्षित प्रवासासाठी तरुणीने उबर बूक केली; तिच्या समोरच चालकाचे किळसवाणे कृत्य

सुरक्षित प्रवासासाठी तरुणीने उबर बूक केली; तिच्या समोरच चालकाचे किळसवाणे कृत्य

गुरुग्राम : कॅबमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. आता गुरुग्राममध्ये ताजी घटना घडली आहे. उबर चालकाने एका तरुणीसमोर हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून ही तरुणी दिल्ली विश्वविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. 


तरुणीने मंगळवारी सेक्टर 51 हून हुडा सिटी सेंटर मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ता सुभाष बोकन यांनी सांगितले की, ही तरुणी जेव्हा कारमध्ये बसली तेव्हा तो चालक हस्तमैथुन करू लागला. चालकाचे नाव मनोज कुमार आहे. त्याचे हे कृत्य पाहून तरुणीला किळसवाणे वाटले.


यानंतर ही तरुणी मेट्रो स्टेशनवर कॅबमधून उतरली आणि रिक्षा पकडून घरी गेली. तिने या प्रकारची माहिती तिच्या वडिलांना दिली. यानंतर सेक्टर 51 पोलिस ठाण्य़ामध्ये तक्रार देण्यात आली. आरोपी हिसारचा राहणारा आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. 

Web Title: The young woman booked an Uber for a safe trip; The driver's started masturbation in front of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.