जळगाव शहरात तरुणाची चाकूने भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 11:14 IST2019-12-19T11:14:14+5:302019-12-19T11:14:18+5:30

कोंबडी मार्केटजवळील दिशा एंटरप्रायजेस या दुकानाच्या समोर अंडापावच्या गाडीवर रात्री वाद झाला होता.

a young man was stabbed to death with a knife In Jalgaon | जळगाव शहरात तरुणाची चाकूने भोसकून हत्या

जळगाव शहरात तरुणाची चाकूने भोसकून हत्या

जळगाव : शहरात प्रशांत सिद्धेश्वर गंजाळे (३५ रा. शाहू नगर) या तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आ तूली. युवराज हाॅटेलच्या पाठीमागे असलेल्या जेएमपी मार्केटमध्ये जैन ग्लोबल एंटरप्रायजेस या दुकानाच्या ओट्याला लागून रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.

कोंबडी मार्केटजवळील दिशा एंटरप्रायजेस या दुकानाच्या समोर अंडापावच्या गाडीवर रात्री वाद झाला होता. तेथेच प्रशांतच्या छातीत चाकूने वार झाले. तेथून जीव वाचवण्यासाठी तो तशाच अवस्थेत धावत सुटला. रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, सहायक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण निकम, सहायक निरीक्षक गणेश बुवा दाखल झाले आहेत. कारण व मारेकरी अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

Web Title: a young man was stabbed to death with a knife In Jalgaon