येरवड्यात एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने वार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 03:03 PM2020-05-18T15:03:52+5:302020-05-18T15:04:49+5:30

लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कोयत्याने डोक्यात वार

A young man was beaten by weopan from dispute over looking at each other In Yerwada | येरवड्यात एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने वार,

येरवड्यात एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने वार,

googlenewsNext
ठळक मुद्देचौघांना अटक  जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात ५ ते ६ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी येरवडापोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
विशाल कैलास बाणेकर (वय २३), अनिकेत अनंत कसबे (वय १९), प्रफुल्ल गणेश कसबे (वय १९), अजय युवराज कसबे (वय १९, सर्व रा़ लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. अर्जुन सोनवणे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी गणेश सुभाष निगडे (वय ३५, रा़ संतनगर, लोहगाव) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना येरवड्यातील विडी कामगार वसाहतीजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडली होती. त्यात महेश निगडे हा जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश निगडे यांचा लहान भाऊ महेश निगडे याचे आरोपींबरोबर एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन भांडणे झाली होती. याच भांडणातून विशाल बाणेकर व इतरांनी महेश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कोयत्याने डोक्यात वार केले. वार चुकविण्यासाठी त्याने हात मध्ये घातला असता हाताच्या बोटांवर कोयत्याचा वार लागला आहे. 
पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना लागू असताना देखील आरोपींनी आदेशाचे उल्लंघन करुन मास्क न लावता लोकांच्या जिवितास धोका होईल, असे कृत्य केले आहे. त्यानुसार राष्ट्रीय आपत्ती कायद्याच्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: A young man was beaten by weopan from dispute over looking at each other In Yerwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.