शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

पूर्वीच्या भांडणातून तरुणाच्या डोक्यात वार करुन कॅनॉलमध्ये फेकले; स्वारगेट येथील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:45 PM

पूर्वी झालेल्या भांडणातून मित्रांनी दारू पिण्यास बोलावून तरुणाच्या डोक्यात वार केले.

ठळक मुद्देयाप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणातून मित्रांनी दारू पिण्यास बोलावून तरुणाच्या डोक्यात वार करुन त्याला कॅनॉलमध्ये फेकून देऊन खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेटपोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.प्रेम ऊर्फ टकल्या परदेशी, ओंकार ऊर्फ पप्पू जोशी (दोघे रा. शिवदर्शन, पर्वती) आणि त्यांचा मित्र गोट्या अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़याप्रकरणी शुभम प्रकाश रोकडे (वय २४,रा.शाहू वसाहत, पर्वती) याने फिर्याद दिली आहे. या तिघांनी मारुन टाकण्याच्या उद्देशाने शुभमला कॅनॉलमध्ये फेकल्यानंतर ते पळून गेले. सुदैवाने पाणी कमी असल्याने शुभम बाहेर आला व चालत लक्ष्मीनारायण चौकात आला.  तेथे एका बिल्डिंगच्या खाली तो रात्रभर बेशुद्ध पडला होता. सकाळी शुद्धीवर आल्याने एका माणसाच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले.याबाबत पोलिसांनी सांगितले की, ओंकार आणि शुभम यांच्यात रविवारी भांडणे झाली होती. त्यानंतर सोमवारी रात्री प्रेम याने शुभम याला फोन करुन ओंकार याच्या घरी बोलविले. तेथे ते दारु पित बसले. तेथे प्रेम याच्या ओळखीचा गोट्या आला. त्यानंतर त्यांना गुटखा खाण्याची तल्लफ झाली. मोटारसायकलवरुन स्वारगेटला येत असताना ते लघुशंकेसाठी कॅनॉल रोडला थांबले. तेथे प्रेम याने तु ओंकारबरोबर काल का भांडला. आता तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून शुभम याच्या डोक्यात दगडाने व चिनीमातीच्या टोकदार वस्तूने मारले. गोट्या याने त्यांच्याकडील हत्याराने वार करुन जखमी केले. त्यानंतर शुभम याला कॅनॉलच्या पाण्यात फेकून ते पळून गेले.शुभम हा सकाळी शुद्धीवर आल्यावर एका माणसाच्या मदतीने त्याने घरच्याशी संपर्क साधला. त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाइकवडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारती हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा जबाब नोंदविला. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Swargateस्वारगेटMurderखूनPoliceपोलिसArrestअटक