गलतीसे मिस्टेक? तरूणाने गळा दाबून पत्नीची केली हत्या, मग पोलिसांना म्हणाला - हे चुकून झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 10:21 IST2023-03-29T10:21:12+5:302023-03-29T10:21:41+5:30

Crime News : पोलिसांनी यावर सांगितलं की, हा कौटुंबिक वादातून घडलेला प्रकार आहे. चौकशी केली जात आहे.

Young man killed his wife strangulation then said to police it was mistake | गलतीसे मिस्टेक? तरूणाने गळा दाबून पत्नीची केली हत्या, मग पोलिसांना म्हणाला - हे चुकून झालं!

गलतीसे मिस्टेक? तरूणाने गळा दाबून पत्नीची केली हत्या, मग पोलिसांना म्हणाला - हे चुकून झालं!

Crime News : झारखंडच्या रांचीच्या बुंडूमध्ये एका व्यक्तीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली. हत्येचं कारण विचारलं तर त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या हातून हे चुकून झालं. तेच पोलिसांनी यावर सांगितलं की, हा कौटुंबिक वादातून घडलेला प्रकार आहे. चौकशी केली जात आहे. आरोपीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, व्यक्तीचं मानसिक संतुलन ठीक नाही.

ही घटना रांचीपासून साधारण 45 किलोमीटर दूर बुंडूच्या गितिलडीह गावातील आहे. येथील विस्वा मुंडा नावाच्या एका व्यक्तीने त्याची 28 वर्षीय पत्न सोनामनी देवीची गळा दाबून हत्या केली. त्याने तिला मारहाण केली होती.

घटनेनंतर आरोपी म्हणाला की, त्याने स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नात त्याला कुणीतरी म्हणालं की, पत्नीची हत्या कर नाहीतर ती तुझी हत्या करेल. याच कारणाने त्याने पत्नीची हत्या केली. आरोपी पोलिसांना म्हणाला की, हे चुकून झालं. आरोपी मजुरी करतो आणि त्याला तीन मुलं आहेत.

आरोपीच्या भावाने सांगितलं की, विस्वाने त्याच्या पत्नीची हत्या केली. मुलांच्या रडण्याच्या आवाज ऐकून मोठा भाऊ विस्वाच्या घरी पोहोचला तेव्हा विस्वाने पत्नीची हत्या केली होती. कुटुंबियांनी महिलेला डॉक्टरांकडे नेलं तर त्याने तिला मृत घोषित केलं.

Web Title: Young man killed his wife strangulation then said to police it was mistake